डाॅ. विवेक माँटेराे, गीता महाशब्दे
शिक्षणाच्या प्रवासात खूप मुलं नापास हाेतात म्हणून शिक्षणच ऐच्छिक करावं असा मुद्दा काेणी मांडत नाही. परंतु खूप मुलं गणितात नापास हाेतात, म्हणून आठवीपासून गणित ऐच्छिक करण्याचा प्रस्ताव काही लाेक अत्यंत गांभीर्याने मांडत आहेत. गणिताला शिक्षणातून वजा करण्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी (हाेऊ दिली) तर त्याचे काय परिणाम हाेतील ते पाहूया. आज लाखाे मुलं गणितात नापास हाेऊन दरवर्षी गणित साेडतात. गणित ऐच्छिक केलं तर मुळातच ते शिकवलं नाही म्हणून गणित न शिकणाèया मुलांची संख्या दरवर्षी वाढतच जाईल. परिणाम ताेच राहील. लाखाे शालेय विद्यार्थी, विशेषतः गरीब आणि मागास वर्गातले, गणिती ज्ञान आणि काैशल्यांपासून वंचित राहतील.
Join Over 10,000 Students, Teachers & Parents Enjoying Maths
Become Part of NLF family.
Get Social