उच्च वैचारिक काैशल्यांचा विकास
मुलांच्यात ‘गणितीकरणाच्या‘ क्षमतेचा विकास हाेणं हे गणित शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उच्च वैचारिक काैशल्ये विकसित करावी लागतात.
गणितीकरण म्हणजे काय? तर समाेर असलेल्या वास्तवाची गणिती भाषेत मांडणी करणे आणि गणिती रुपातील मांडणीला याेग्य असे वास्तव सांगणे.
उदा. डाॅक्टरांनी राेज 2 गाेळ्या 30 दिवस घ्यायला सांगितल्या असतील तर त्याची गणिती मांडणी म्हणजे 2 x 30 = 60 हा गुणाकार. तसेच 30 x 2 असा गुणाकार समाेर आल्यास त्याचे व्यवहारातले उदाहरण देता येणं.
डाॅक्टरांनी राेज 30 गाेळ्या असे 2 दिवस घ्यायला सांगितले हे उदाहरण व्यवहाराशी जुळत नाही. 30 रुपयाला एक पुस्तक अशी 2 पुस्तके घेतली हे ते उदाहरण असू शकते. राेजच्या जीवनात उपयाेगी ठरणाèया संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया, मापन, दशांश अपूर्णांक, शेकडेवारी अशा अनेक क्षमतांचा विकास करणे हे गणित शिक्षणाचे मर्यादित उद्दिष्ट आहे. परंतु याच्याही पलीकडे जाऊन उच्च वैचारिक काैशल्ये आत्मसात करण्याची ताकद मुलांना देणे हे गणित शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे.
Join Over 10,000 Students, Teachers & Parents Enjoying Maths
Become Part of NLF family.
Get Social