प्राथमिक गणिताचे सार्वत्रिकीकरण खराेखरच शक्य आहे का?
ज्ञानविज्ञानावर समाजातल्या फक्त मूठभर लाेकांचाच अधिकार रहावा यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे इतर समाजघटकांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचं काम गेली हजाराे वर्षे झालेलं आहे. ज्ञानविज्ञानाचं महत्त्व आणि ते खरंचच लाेकांपर्यंत पाेहाेचलं तर या मक्तेदारीला असलेले धाेकेही तितक्याच पूर्वीपासून लाेकांना माहीत आहेत. शिक्षण सर्वांसाठी तत्वतः खुलं झालं त्यालाही आता बरीच वर्ष लाेटली. या काळामध्ये दर्जेदार ज्ञानापासून सामान्य लाेकांना वंचित ठेवण्याच्या पद्धती बदलत गेल्या. एकीकडे बालकामगारी जपत जेमतेमसाक्षरतेच्या पातळीवर दिलं जाणारं शिक्षण, दहावीला सर्व विषय सक्तीचे करणारा निर्णय, गणित-विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमधली अधिकाधिक संस्कृतप्रचूर हाेत गेलेली भाषा… अशी अनेक उदाहरणं आपल्यासमाेर आहेत. गेल्या काही वर्षांच्या कामाच्या अनुभवातून असं आत्मविश्वासाने म्हणता येतं की ही चाकं उलटी गिरवणं शक्य आहे. प्रत्येक मुलाला आणि मुलीला दर्जेदार प्राथमिक गणित आणि विज्ञान आत्मसात करता येणं शक्य आहे !
Join Over 10,000 Students, Teachers & Parents Enjoying Maths
Become Part of NLF family.
Get Social