Scientific Temper

Scientific Temper2022-01-04T08:54:23+05:30

National Scientific Temper Day

‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराबाबतचे वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांतर्फे निवेदन

“वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारक वृत्ती वाढवणे व त्यांचा प्रसार व प्रचार करणे”, हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 A(h) नुसार भारताचे नागरिक म्हणून आपलं मूलभूत कर्तव्य आहे. केवळ तेवढंच नाही, तर २१ व्या शतकातील जागतिक समाजाचा घटक म्हणूनही ते आपलं मूलभूत आणि सामूहिक कर्तव्य आहे.

या कामाकडे आपण पुरेसं लक्ष आजवर दिलेलं नाही, त्यासाठी आवश्यक तितकी बांधिलकी दाखवलेली नाही, असं आम्हाला वाटतं. त्याऐवजी, विरुध्द दिशेने जाण्याचे, चिंताजनक आणि अस्वस्थ करणारे आक्रमक प्रयत्नच जास्त होत आहेत. म्हणूनच जास्त जोमाने, उत्साहाने, पद्धतशीरपणे आणि सातत्याने सर्व पातळ्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचे कार्य तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे.  हे काम पुढे नेण्यात शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका विशेष महत्त्वाची आणि निर्णायक असणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हे केवळ वैज्ञानिकांचे काम नसून भारतीय लोकशाहीतील सर्व नागरिकांचे ते काम आहे.

सध्याच्या काळातल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या खंद्या पुरस्कर्त्यांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर अग्रेसर होते. आपल्या व्याख्यानांमधून आणि लेखांमधून त्यांनी हा विषय समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत नेला. २० ऑगस्ट हा त्यांचा हौतात्म्यदिवस देशभरात राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करणे हे त्यामुळे अगदी योग्य आहे.

येथे सह्या केलेले आम्ही सर्वजण, या मोहिमेला पाठिंबा देत आहोत. बहुश्रुत आणि तर्कनिष्ठ लोकांचा विवेकी आणि मानवतावादी भारत घडविण्यासाठी  सर्व जाणत्या आणि जागरूक नागरिकांनी, शैक्षणिक संस्था- संघटनांनी या सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.

Statement of Scientists and Educationists On Promoting Scientific Temper and Observing ‘National Scientific Temper Day.’

As citizens of India as well as part of the world community of the 21st Century, it is one of our fundamental and civilizational duties “to develop and promote the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform;”, as per article 51 A(h) of our Constitution.

We believe that this task has not received the attention and commitment it deserves and calls for, and on the contrary, there is a very worrying and disturbing atmosphere being whipped in the opposite direction. There is therefore an urgent need to take it up with much vigour and enthusiasm in a systematic and sustained manner at all levels. The role of schools, colleges and the educational institutions is particularly important and critical in taking it forward. Promoting scientific temper is not only the work of scientists, but of all citizens in Indian democracy.

Dr. Narendra Dabholkar was one of the foremost proponents of scientific temper in recent times. Through his lectures and writings, he spread the message of scientific temper among all sections of society. It is therefore particularly appropriate that 20th August, the day on which he was martyred should be observed as ‘National Scientific Temper Day’ all over the country.

We the undersigned, endorse and support this move, and appeal to all informed and concerned people as well as all educational institutions, organizations to join in this collective national endeavour for observing ‘National Scientific Temper Day’, towards building an India of reason and humanity with well informed and rationally empowered citizens.

All India Peoples’ Science Network (AIPSN)

Navnirmiti Learning Foundation is proud to be affiliated with the AIPSN.

AIPSN is a network of organisations from all parts of India working for the popularisation of science and propagation of scientific temper.

AIPSN has resolved to celebrate 20th August as National Scientific Temper Day (NSTD).

Resources

NSTD Articles

Scientific Temper Videos

Role of Science Education in Promoting Scientific Temper – Dr. Vivek Monteiro

Pseudoscience is Foundation of Paseudonationalism – Dr. Vivek Monteiro

Contact Us

129B/2, 5th floor, Infinity Building, Opp. Canara Bank, Law College Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top