स्वयं-निर्मित गणित कीट वापरून आपण पुढील काही सत्रामध्ये भूमीतीमधील काही महत्वाच्या संकल्पना शिकणार आहोत.

मागच्या सत्रामध्ये आपण रेषाखंड आणि रेषा ह्या मधला फरक समजून घेतला, सांगितलेल्या मपाचा रेषाखंड कसा काढायचा, कोन म्हणजे काय?, कोन कसा काढायचा आणि कसा मोजायचा हे देखील शिकलो, कोनाचे वेगवेगळे प्रकार बघितले.

ह्या सत्रामध्ये आपण त्रिकोण कसा काढायचा आणि त्रिकोणाचे काही गुणधर्म शिकणार आहोत. त्याचबरोबर समलंब चौकोन म्हणजे काय आणि समलंब चौकोनाचे काही गुणधर्म बघणार आहोत.

ह्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा फोटो बघून ते साहित्य तुम्ही गोळा करून ठेवा.

स्वतः कृती करून गणितामधील काही संकल्पना आपण ह्या सत्रामध्ये शिकणार आहोत. स्वतः करून बघणे आणि मग ते आत्मसात करणे म्हणजेच शिकणे. तुम्ही तयार केलेलं गणित कीट सोबत घेऊन बसा म्हणजे तुम्ही स्वतः सांगितलेल्या सर्व गोष्टी करून बघू शकाल.

प्रत्येक व्हिडीओ नंतर तुम्हाला घरी करण्यासाठी गृहपाठ असणार आहे. हा गृहपाठ करत असताना तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही आम्हाला नक्की विचारा. ह्या वेळचा गृहपाठ पुढे दिलेल्या फाईलमध्ये आहे.

पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.

फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH…
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: [email protected]

#त्रिकोण #समलंब_चौकोन #त्रिकोणाचे_गुणधर्म #समलंब_चौकोनाचे_गुणधर्म #learnmath #teachmath #schoolmath #mathforall #handsonmath #universalmath #universalactivemath #UAM #Navnirmiti_Learning_Foundation #Edugenie #Navnirmiti_Eduquality_Foundation #Geeta_Mahashabde #Vivek_Monteiro #Dinesh_Lahoti #Janaganit #जनगणित #EBCDMath #EverybodyCanDoMath