०३ जानेवारी २०२१ – जनगणित : अपूर्णांकाचा गुणाकार जानेवारी महिन्यात एक प्रयोग करण्याचे आपण मिळून ठरवले आहे. झूम सेशन न करता आपण यूट्यूब आणि फेसबुक वर रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहोत. तो व्हिडिओ पाहताना साहित्य घेऊन बसा. स्वतः कृती करा. पाहिजे तेव्हा तुम्ही व्हिडिओ थांबवून कृती करू शकाल. ह्या आधी झालेल्या अपूर्णांकाच्या सत्रांमध्ये आपण अपूर्णांकांची ओळख, सममूल्य अपूर्णांक, अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांकांचा गुणाकार करायला शिकणार आहोत. साहित्य वापरून अगदी सोप्प्या पद्धतीने आपण ही नवीन संकल्पना सुद्धा शिकणार आहोत.
हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.
Worksheet Link : https://navnirmitilearning.org/wp-content/uploads/2021/01/fraction-multiplication-final.pdf
फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath
वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: janaganit@gmail.com
Get Social