आत्ता पर्यंत अपूर्णांकाची ३ सत्रे झाली आहेत ज्यामध्ये आपण अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ह्या बद्दल अभ्यास केला आहे. त्याच बरोबर आपण स्वतःच अपुर्णाकांच किट देखील बनवायला शिकलो. आजच्या सत्रामध्ये आपण नवीन संकल्पना शिकणार आहोत. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? सममूल्य अपूर्णांक कसे तयार होतात? ह्या महत्वाच्या संकल्पना आपण कृती करता – करता शिकणार आहोत. सममूल्य अपूर्णांक तयार करताना अंश आणि छेद पटीमध्ये कसे कमी किंवा जास्त होतात हे सोप्या पद्धतीने शिकुयात.
हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.
मित्रमेैत्रिणींनो, 6 डिसेंबरच्या जनगणित तासाला तुम्ही अगदी सहजपणे सममूल्य अपूर्णांक तयार केलेत. ती समान गुणोत्तरे पण होती. त्यांची अंकातली मांडणी पण तुम्ही केलीत. ती अधिक पक्की व्हावी यासाठी पुढील लिंकवरील वर्कशीटस सोडवा. १३ डिसेंबरच्या जनगणित तासाच्या आधी.
पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.
फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath
वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: janaganit@gmail.com
Get Social