भूमिती सत्र १ : ह्या सत्रामध्ये आपण रेषा आणि रेषाखंड म्हणजे काय? तसेच त्यामध्ये काय फरक आहे हे बघणार आहोत. वेगवेगळ्या मापाचे रेषाखंड कसे काढायचे ते देखील बघुयात. त्यानंतर आपण कोन म्हणजे काय आणि कोनांचे कोण-कोणते प्रकार आहेत ह्या बद्दल शिकणार आहोत. काटकोन म्हणजे काय? काटकोनापेक्षा लहान कोनाला काय म्हणतात आणि कोन मोठा असेल तर त्याला काय म्हणतात? कोन काढण्यासाठी कोनमापकाचा उपयोग कसा करायचा आणि दिलेल्या मापाचा कोन कसा काढायचा हे देखील बघणार आहोत.
हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.
Get Social