भागाकारातून अपूर्णांकाच्या संकल्पनेकडे From Division to Concept of Fractions
ज्या कोणाला मुलांना अपूर्णांक शिकवायचे आहेत, अशा सर्व मोठ्यांसाठी हा विडिओ आहे. शिक्षक, पालक, स्वयंसेवक सर्वांसाठी ! बोलताना मात्र शिक्षकांना उद्देशून मांडणी केलेली आहे.
मुलांना जो अनुभव द्यायचा असेल, तो अनुभव तुम्ही स्वतः आधी घेतलेला असणं महत्त्वाचं आहे.
म्हणजे शोधाचा आनंद काय असतो, तो नेमका कोणत्या क्षणी मिळतो, कोणती गोष्ट आपण सांगायची नाही, मुलांना सापडेपर्यंत वाट पाहायची, हे सगळं आपल्याला अनुभवाने नीट कळतं.
हा विडिओ पाहून शिकताना शिक्षकांनी शक्यतो ४-५ जणांच्या गटात बसावं. किंवा किमान एकतरी जोडीदार असावा बरोबर. म्हणजे मधेच व्हिडिओ थांबवून तुम्ही आपापसात चर्चा करू शकाल.
त्यासाठी आता व्हिडिओ पॉज करा आणि पुढील साहित्य घेऊन बसा. (या सगळ्याची व्हिजुअल येतील)
• चार पाट्या
• कागदाचे एकाच मापाचे बरेच गोल – जुन्या पेपरचे पण चालतील (पोळ्या म्हणून वापरण्यासाठी),
• २० दगड किंवा ठोकळे
• = चिन्ह लिहिलेलं कार्ड
• मासिकाचे पाच कागद
• पाच संत्री, पाच छोट्या ताटल्या किंवा बशा
• चौकटीची वही आणि रंगीत तेली खडू – क्रेयॉन्स
या व्हिडियोवर क्लिक करून आपण हा धडा शिकू शकता…
Get Social