गणिताच्या निरनिराळ्या भाषा म्हणजे नेमकं काय? / Different Languages of Math : What does it mean?
संख्यांचा संख्यापणा म्हणजे त्यात ‘किती’ आहेत हे समजणं. मुलांनी स्वतः कृती करत ‘संख्यापणा’ आत्मसात करणं महत्वाचंआहे. मुलांना परिचित असलेल्या रुपांमध्ये संख्या शिकवल्या की मुलं चटकन संख्यापणा समजून घेतात.
उदाहरणार्थ : ४ ही संख्या वेगवेगळ्या प्रकारे कशी तयार करता येईल? किंवा कोणकोणत्या भाषांमध्ये ती दाखवता येईल? वस्तूंची-भाषा बोटांची-भाषा रुपयांची-भाषा कृतींची-भाषा आवाजांची-भाषा चित्रांची-भाषा ह्यापैकी कोणतीही भाषा वापरताना मुलांचा अनुभव लक्षात घेणं महत्वाचं आहे.
प्रत्येक मूल वेगळं असतं. त्यामुळे त्याची गरजही वेगळी असते, ज्या मुलाला ऐकू येत नाही, असं मूल वस्तूंच्या, चित्रांच्या भाषेतून सहज शिकेल. ज्या मुलाला दिसत नाही असं मूल वस्तूंच्या आणि आवाजांच्या भाषेतून शिकेल. या सर्व भाषांमध्ये मुलांना संख्या तयार करता येऊ लागली, की एका रुपातील संख्या पाहून इतर सर्व रुपांमध्ये ती देण्याचा खेळ खेळायचा आहे.
‘संख्यांचा संख्यापणा’ कसा शिकवावा , त्यासाठी कोणत्या कृती (activities) कराव्यात, हे सांगणारा व्हिडिओ खाली दिलेला आहे.
Each number has a ‘numberness’ – ‘How many’? – It is important for children to discover the numberness themselves while doing activities. Numbers can be represented in many languages. For example: Number 4 How can four be made in different ways? Or how can it be shown using different languages? Language of Objects Language of Fingers Language of Rupees Language of Actions Language of Sounds Language of Pictures It is important to consider the experience of children while using any of these languages. Every child is different and hence her needs are different. A child who has hearing disability will learn easily in the language of things and pictures, whereas, a child who has blindness will easily learn using the language of sounds and things. After children are comfortable with making numbers in all these languages we can play the game of representing a number given in one language into all other languages.
Watch the following video to understand activities involved in learning “Different Languages of Mathematics” !

