अंक-भाषेची ओळख / Language of Numbers
क्रमाने संख्या आधी तयार करणे आणि मग लिहिणे, अशी सवय मुलांना लागणे गरजेचे आहे. संख्या कश्या लिहायच्या हे शिकवताना ती संख्या वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार करायला सांगितले तर मुलांना संख्यापणा म्हणजे काय हे समजण्यास मदत होते. हे समजल्यानंतर लिहिलेली संख्या ओळखायला मुलांना सोप्पे जाते. १ ते ५ संख्या अश्या प्रकारे शिकवून झाल्यावर मुलांची ह्या पाच संख्याची तयारी आधी करून घेणे महत्वाचे आहे. ह्यामध्ये एका रूपातून दुसऱ्या रूपात संख्या तयार करणे हे गरजेचे आहे. ५ वस्तू समोर ठेवून त्यामधून एक-एक गोष्ट काढून टाकली तर शेवटी काहीच उरत नाही म्हणजेच ० वस्तू आहेत अश्या प्रकारे ० ची संकल्पना मुलांना शिकवायची आहे.
एक ते पाच संख्या शिकवण्याच्या कृती दाखवणारा हा व्हिडिओ पहा..
Children need to get used to the habit of making the number and then write the numbers in order. When teaching how to write numbers, asking them to create the numbers in different languages helps children understand what numberness is, and once they understand that, it becomes easier for children to recognize written numbers. Teach 1 to 5 numbers in this way, and make sure that children are comfortable with these first 5 numbers. It is necessary to practice creating numbers from one form to another. In order to introduce concept of zero, keep 5 objects in front of them. If the objects are removed one by one, then nothing is left at the end, i.e. there are 0 objects.
Watch the video to learn how to teach numbers 1 to 5 and also concept of Zero.


Get Social