तुम्ही पालक किंवा शालेय शिक्षक आहात का? असाल, तर हे तुमच्या कामाचं आहे.

ऑनलाईन शिक्षण हे तितकसं समाधानकारक नाही हे तुम्ही आत्तापर्यंत नक्कीच अनुभवलं असेल. लॉकडाऊनमुळे मुलांच्या शिकण्यात वारंवार खंड पडला आहे आणि त्यांच्या काही संकल्पना कच्च्या राहून गेल्या आहेत . काही पालक आणि शिक्षकांनी केलेल्या विनंतीवरून, नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन इयत्ता पहिली ते आठवी साठी कार्यशाळा सुरू करीत आहे.

या कार्यशाळा अभ्यासक्रमावर आधारित आणि संकल्पनांनुसार असतील. पालक आणि शिक्षकसुद्धा या संधीचा लाभ घेऊ शकतात. या कार्यशाळांमध्ये आपण प्रत्येक इयत्तेचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकणार आहोत. हा अभ्यासक्रम संकल्पनांप्रमाणे छोट्या-छोट्या भागांमध्ये विभागलेला असेल. तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे काही संकल्पनांसाठी किंवा संपूर्ण अभ्यासक्रमासाठीसुद्धा सहभागी होऊ शकता.

आता अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा संमिश्र माध्यमातून गणित शिकण्यासाठी ही एक उत्तम संधी असणार आहे.

या कार्यशाळा मराठी + इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये एकत्र होणार आहेत. मुले गटांमध्ये एकत्र शिकणार आहेत (इयत्ता १ली + इयत्ता २री, इयत्ता ३री + इयत्ता ४थी, इयत्ता ५वी + इयत्ता ६वी, इयत्ता ७वी + इयत्ता ८वी).

कार्यशाळांचे वेळापत्रक नोंदणीनंतर ठरवण्यात येईल.

कार्यशाळेसंबंधी महत्वाचे आणि ठळक मुद्दे :

  1. वस्तू, चित्र व अंक-चिन्हांच्या भाषांमधील प्रश्न सोडवत, आकृतीबंध तयार करत संकल्पना शिकणेआमच्या केंद्रावर प्रत्यक्ष येऊन शिकणाऱ्या सर्वांना आमच्याकडचे गणित संच वापरता येतील.
  2. जे ऑनलाईन शिकणार आहेत ते गरजेनुसार गणित संच विकत घेऊ शकतील. ते साहित्य तुमच्या पत्त्यावर पोचवण्यात येईल.

या कार्यशाळांमधून तुम्हाला काय मिळेल ?

  • गणित शिकण्याची नवीन पद्धत.

  • गमतीदार आणि सोप्या पद्धती.

  • मी गणित करू शकतो/शकते अशी खात्री.

  • गरजेनुसार वैयक्तिक मदत.

  • सरावासाठी आणि सोडवण्यासाठी वर्कशिटस् .

ह्या आणि ह्यासारख्या सर्व कार्यशाळांबद्दल तुम्हाला आधी सूचित करण्यात येईल.

Share This Post!

Recent Posts

Recent Tweets

Join Over 10,000 Students, Teachers & Parents Enjoying Maths

Become Part of NLF family.

Thank you for your message. It has been sent.
There was an error trying to send your message. Please try again later.